अनुसूचित जाती आणि मातंग समाजातील महिलांना विविध लघुउद्योगाचे प्रशिक्षण देणे. शासनाच्या योजना राबविणे.
संस्थेमार्फत सामाजिक समतेच्यातत्वांचा प्रसार तसेच सामाजिक क्षेत्रातमुलभूत संशोधन व्हावे असे अपेक्षित आहे. संस्थेने निर्भयपणे व परिणामकारक विविध उपक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. सामाजिक उद्दिष्ट पूर्तीसाठी समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी जाती-भेदनिर्मूलन, सामाजिक न्याय, समता, सांप्रदायिक सद्भावना व सहिष्णुता, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक जाणीव जागृती, बंधुत्व व मानवता इत्यादी तत्त्वे समाजात रूजविण्यासाठी संस्थेकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.
संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी संस्थेचे मुख्यालय, पुणे या ठिकाणी सुसज्ज व वाचनसाहित्याने समृद्ध अशा ग्रंथालय व अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. सन 2019 पासून कार्यालयात विविध महत्वपूर्ण विषयांवरील ग्रंथ साहित्याने समृद्ध असे ग्रंथालय व अभ्यासिका संशोधक व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.
ग्रंथालयात सामाजिक, साहित्य, कला या विषयांतर्गत विविध थोर समाजसुधारकांच्या विचारांची अध्यात्मिक, व्यक्तिमत्त्व विकास, विपश्यना, अंधश्रद्धा, आदिवासी समाज, अनुसूचित जाती-जमाती, महिलांविषयक, समिक्षात्मक साहित्य, कायदा, आरोग्य, संदर्भ ग्रंथ – शब्दकोश, मराठी विश्वकोश, भारतीय संस्कृतिकोश, पदनाम कोश, जिल्हा गॅझेटिअर, कृषीशास्त्र, कला, कथा-कादंबरी, चरित्र-आत्मचरित्र, लेखसंग्रह अशा विविध विषयांवर नामवंत लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. सध्या ग्रंथालयात मराठी व इंग्रजी भाषेतील मिळून सुमारे 15 हजार पुस्तके आहेत.
वरील सर्व सामाजिक दायित्व असलेले सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आपल्या देणगीची आवश्यकता आहे. त्याकरीता संस्थेकडे 12A, 80G, CSR1, निती आयोग नोंदणी असल्याणे मान्यवर देणगीदारांना इन्कम टॅक्सवर 50% सवलत मिळणार आहे.